Friday, December 6, 2024
Homeलाईफस्टाइल6,000mAh बॅटरीचा Poco X3 स्मार्टफोन खरेदीची संधी, ‘सेल’मध्ये आकर्षक ऑफर्स

6,000mAh बॅटरीचा Poco X3 स्मार्टफोन खरेदीची संधी, ‘सेल’मध्ये आकर्षक ऑफर्स

flipkart-electronics-sale-discount-and-offers-on-poco-x3-check-details
flipkart-electronics-sale-discount-and-offers-on-poco-x3-check-details

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर Electronics Sale सुरू असून या सेलमध्ये युजर्स अनेक स्मार्टफोन कमी किंमतीत आणि आकर्षक डिस्काउंटसह खरेदी करु शकतात. 16 तारखेपासून सुरू झालेला हा सेल 20 तारखेपर्यंत आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर ‘पोको’ कंपनीचा Poco X3 हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरु शकतो.  सेलमध्ये Poco X3 वरही शानदार ऑफर आणि सवलत मिळेल.  या फोनमध्ये 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली असून फास्ट चार्जिंग फिचरही आहे. यासोबतच फोनमध्ये एकूण पाच कॅमेऱ्यांचा सपोर्ट देण्यात आला आहे.  6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, 64MP चा मुख्य कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 732जी ऑक्टा-कोर प्रोसेसर, असे शानदार फीचर्स या फोनमध्ये आहेत. जाणून घेऊया फोनची किंमत आणि काय आहे ऑफर :-

Poco X3 स्पेसिफिकेशन्स 

कोबाल्ट ब्लू आणि शॅडो ग्रे अशा दोन रंगाच्या पर्यायात POCO X3 हा फोन उपलब्ध आहे. 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम+128जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिअंटमध्ये हा फोन खरेदी करता येईल. काही दिवसांपूर्वीच पोको कंपनीने आपल्या Poco X3 स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेटही आणलं आहे. या नव्या अपडेटनंतर Poco X3 चे युजर्स आपल्या स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग करु शकणार आहेत. आतापर्यंत Poco X3 मध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा नव्हती, त्यामुळे युजर्सकडे कॉल रेकॉर्ड करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. पण आता नव्या अपडेटनंतर युजर्सची ही समस्या सुटणार आहे.

Poco X3 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. 8जीबीपर्यंत रॅमची क्षमता असलेल्या या फोनमध्ये प्रोसेसरसाठी स्नॅपड्रॅगन 732G SoC चिपसेट आहे. फोटॉग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर असा सेटअप आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये असून 128जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मेमरी आहे. आवश्यकता असल्यास मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

किंमत आणि ऑफर 

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये POCO X3 स्मार्टफोनच्या 6GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 499 रुपये, तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 499 रुपये आहे. याशिवाय 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17 हजार 499 रुपये आहे. पण सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर 1000 रुपये इंस्टंट डिस्काउंटची ऑफरही आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास 1000 रुपये सवलत मिळेल. याशिवाय, दरमहा 2 हजार 584 रुपये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय आहे. तसेच, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर पाच टक्के अनलिमिटेड कॅशबॅकची ऑफरही आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments