Wednesday, September 11, 2024
Homeक्रीडान्यूझीलंड विरुद्ध भारताची खराब सुरुवात

न्यूझीलंड विरुद्ध भारताची खराब सुरुवात

मुंबई – न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताची खराब सुरुवात झाली आहे.२९ धावात भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. ट्रेड बोल्टने धवनला बाद करून भारताला १६ धावांवर पहिला धक्का दिला. धवन १२ चेंडूत १ चौकारासह ९ धावा काढून परतला. त्यानंतर बोल्टने रोहित शर्माला बाद करून टीम इंडियाला दडपणाखाली आणले. रोहितने १७ चेंडूत २ षटकारांसह २० धावा केल्या. आता कोहली आणि केदार जाधवची जोडी मैदानावर आहे.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट करीयरमधील आज २०० वा एकदिवसीय सामना खेळत आहे.

यंदाच्या मोसमात एकतर्फी विजयांचा धडाका लावलेल्या भारतीय संघाचे पारडे न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत नक्कीच वरचढ असेल. श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत क्लीन स्वीप दिल्यानंतर घरच्या मैदानावर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियालाही भारताने सहज लोळवले. हाच फॉर्म भारतीय संघाने कायम राखल्यास किवी संघाला यजमानांना रोखणे अत्यंत कठीण जाईल. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भारतीय संघ समतोल असून त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी प्रत्येक विजयामध्ये मोलाचे योगदान दिले असून हीच बाब भारतीय संघासाठी मजबूत आहे. एक संघ म्हणून विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शानदार आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे तीन वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवरच भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्या वेळी, आफ्रिकेने ४०० हून अधिक धावांचा तडाखा देत भारताला सहजपणे पराभूत करीत मालिकाही जिंकली होती. मात्र या पराभवानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग तीन मालिका जिंकल्या असून न्यूझीलंडविरुद्धही भारताचाच विजय मानला जात आहे.

दुसरीकडे, किवी संघाला माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलरकडून सर्वाधिक आशा असेल. दुसºया सराव सामन्यात आक्रमक शतक झळकावताना त्याने भारताला एक प्रकारे इशाराही दिला. तसेच, टॉम लॅथमनेही आक्रमक शतक ठोकत न्यूझीलंड फलंदाजीची ताकद दाखवली आहे. त्याचप्रमाणे सलामीवीर मार्टिन गुप्टिल, कर्णधार केन विल्यम्सन यांच्यावर फलंदाजीची मदार असेल.

गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी हे भारतीय फलंदाजीला खिंडार पाडण्याची क्षमता राखून आहेत. तसेच, मिशेल सँटेनर आणि ईश सोढी या फिरकीपटूंवर मधल्या षटकांमध्ये भारताचा धडाका रोखण्याची जबाबदारी असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments