Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशतुम्ही जनतेला फार काळ मुर्ख बनवू शकत नाही - मनमोहन सिंह

तुम्ही जनतेला फार काळ मुर्ख बनवू शकत नाही – मनमोहन सिंह

राजकोट – माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकोट येथे जीएसटीच्या मुद्दावरून भाजपवर निशाणा साधला. मेकॅनिकल सामग्रीवर २८ टक्के जीएसटी लागू करण्याने अर्थव्यवस्थेला कसा काय फायदा होऊ शकतो, हे मला अद्याप समजले नाही. जनतेला फार काळ मुर्ख बनवू शकत नसल्याची टीका केली.

मनमोहन सिंग म्हणाले, यूपीए शासनकाळाच्या तुलनेचा विचार केला असता, अर्थव्यवस्थेमध्ये पाच वर्षात १०.६ टक्के वाढ व्हायला हवी आणि असे झाले तर मला खुप आनंद होईल. परंतु मला असे होईल असे जराही वाटत नसल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदींनी गुजराती जनतेला देखील सोडले नाही. गुजरातच्या सरकारी शाळामध्ये शिक्षकांची कमतरता आहे. जे शिक्षक आहेत त्यांची अवस्था एका चाकरीच्या गड्यासारखी झाली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. जिथे शिक्षकांची ही अवस्था आहे तेथील समाजाचा विकास कसा होणार. जर गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आले तर आम्ही सुरूवातील शिक्षणाची बिघडलेली घडी व्यवस्थित करू, शिक्षकांना योग्य वेतन, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन मनमोहन सिंग यांनी गुजराती जनतेला दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments