देहरादुन : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशा स्थितीत विविध राज्यात होळी सण साजरा करण्याबाबत काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे होळी सणावर कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडमध्ये आपल्या घरी खास पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. यावेळी पारंपरिक वाद्य आणि नृत्य पार पडलं. तसंच फुलांची उधळणही करण्यात आली.
अपने गृह प्रदेश उत्तराखण्ड में होल्यारों का अपने आवास में स्वागत किया व कुमाऊँनी खड़ी होली में सहभागिता की । pic.twitter.com/zRtnQAvAre
— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) March 28, 2021
“आपला गृह प्रदेश असलेल्या उत्तराखंडमध्ये होल्यारो यांचं निवासस्थानी स्वागत केलं आणि कुमाऊँनी खडी होलीमध्ये सहभाग घेतला”, असं ट्वीट भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करताना आणि टाळी वाजवून वाद्यांना साथ देताना कोश्यारी दिसून आले. यावेळी फुलांची उधळण करण्यात आली.
वाचा: खबरदार: यंदा धुळवड खेळायला गेलात तर पोलिसांकडून कारवाई होणार
राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद ठाकरे सरकारच्या पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधीदरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा 12 आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.