Friday, December 6, 2024
Homeदेशतमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना PM मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना PM मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य

चेन्नई येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Congress-leader-rahul-gandhi-says-it-is-unbearable-to-see-tamil-nadu-cm-forced-to-touch-feet-of-pm-modi-and-amit-shah-news-updates
Congress-leader-rahul-gandhi-says-it-is-unbearable-to-see-tamil-nadu-cm-forced-to-touch-feet-of-pm-modi-and-amit-shah-news-updates

चेन्नई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी संधी मिळाल्यावर पंतप्रधान मोदींसह अमित शाह यांच्यावर निशाणा साधतात. रविवारी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. गांधी म्हणाले की, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांना खाली वाकून पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करायला सांगितले गेले. तामिळनाडूला नतमस्तक होण्यास भाग पाडलेले पाहणे असह्य आहे.

चेन्नई येथे एका निवडणूक सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “निवडून आलेल्या प्रतिनिधीने अमित शहा यांच्या पायाला स्पर्श करणारे चित्र मी पाहिले. भाजपामध्ये फक्त एकच संबंध आहे जिथे आपल्याला भाजपाच्या नेत्याच्या पायाला स्पर्श करावा लागतो, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यापुढे वाकावे लागते. ”

“भारताचे पंतप्रधान तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यावर नियंत्रण ठेवताना आणि शांतपणे त्यांच्या पायाला स्पर्श करताना जेव्हा मी पाहतो तेव्हा ते स्वीकारण्यास माझं मन तयार होत नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना अमित शहापुढे नमन व्हायचे नसले तरी त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांना असे करावे लागते,” असे राहुल गांधी यांनी चेन्नईत सांगितले.

राहुल गांधी पुढे म्हणाले, “तमिळनाडू सारखे राज्य, ज्याला इतकी मोठी भाषा आणि परंपरा आहे. अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा याच्यासमोर वाकलेले त्यांच्या पाया पडलेले पाहणे मला असह्य.” ते पुढे म्हणाले, “एखादा मोठा नेता या लोकांसमोर वाकतो आहे याचा मला राग आला आहे आणि म्हणूनच मी आज येथे आलो आहे. मला इथल्या लोकांशी समानतेचे संबंध हवे आहेत. ”

“पण एक फरक आहे. जर मी तमिळनाडू हा भारत आहे असे म्हटले तर मला हे देखील स्वीकारावे लागेल की भारत हा पण तामिळनाडू आहे. माझ्यासाठी, ज्या देशात तमिळनाडूला झुकण्यास भाग पाडले जात आहे तो भारत नव्हे तर काहीतरी वेगळंच आहे, ”ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments