Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेश'टाइम'च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींना स्थान नाही

‘टाइम’च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींना स्थान नाही

Time Magasine, PM Modiनवी दिल्ली: अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मासिकानं प्रभावशाली व्यक्तींची यादी घोषित केली आहे. या यादीत यंदा मोदी स्थान मिळवू शकले नाहीत. जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान देण्यात आलेलं नाही.

या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान, चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन, आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लियो वराडकर आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या दिग्गज राष्ट्रप्रमुखांचा ‘टाइम’च्या यादीत समावेश आहे.

शंभर जणांमध्ये केवळ चार भारतीय

जागतिक १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विविध विभागात केवळ चार भारतीयांनीच स्थान मिळवलं आहे.  यामध्ये ओला कॅबचे सह संस्थापक भावीश अग्रवाल, अभिनेत्री दीपिका पदुकोण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा समावेश आहे.

टाइम मासिकातर्फे दरवर्षी जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments