Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशपरीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

लखनौ- देशामध्ये सध्या लहान मुली, महिला, तरुणींवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताहेत. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित तरुणी बीए द्वितीय वर्षांमध्ये शिकत होती. परीक्षा देऊन घराकडे परतत असताना काही नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. यामुळे उत्तरप्रदेशात पुन्हा खळबळ उडाली.

यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उन्नाव सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेशात ६ बलात्काराच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  काही दिवसांपूर्वी इहाट येथे एका ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील स्थानिकांनी संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थितीदेखील निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी वरात पाहायला गेलेल्या चिमुकलीचा बलात्कार करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments