Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशभाजपा प्रदेश अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

भाजपा प्रदेश अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

K Hari Babuहैदराबाद : आंध्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष कंभमपाटी हरिबाबू यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी थेट आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सोपवला. भाजप आपल्या पक्षात बदल करत आहे. तसेच नव नवीन योजना आणण्यासाठी त्यांना भाजपकडून राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.

भाजपची रणनीती

तेलुगू देशम  पार्टीने भाजपची साथ सोडल्याने या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला. त्यामुळे भाजपने आंध्र प्रदेशमधील आपल्या कार्यकारणीत बदल करण्याचा निर्णय घेतला. तसेच येथे पक्षाला अधिक पकड मजबूत करण्यासाठी वेगळी रणनीती आखायची आहे. त्यामुळे भाजपकडून के हरिबाबू यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या या धक्कातंत्रामुळे प्रदेश भाजपमध्ये राजकीय भूकंप झालाय.

कापू समाजाला प्रतिनिधीत्व

एमएलसी सोमू वीर राजू, आमदार आणि माजी मंत्री पी मानिकला राव, माजी काँग्रेस नेते कन्ना लक्ष्मीनारायण आणि यूपीए सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री डी पुरंदेश्वरी यांच्यापैकी एकाला प्रमुख पदाचे दावेदार मानले जात आहे. लक्ष्मीनारायण आणि पुरंदेश्वरी या दोघांनी काँग्रेसचा हात सोडत २०१४ ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, कापू समाजातून आलेले सोमू वीर राजू आणि पी मानिकला राव यांना आंध्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष पद मिळू शकते किंवा त्यांना प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. दरम्यान, कापू समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात येण्याची शक्यता अधिक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments