Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeदेशशहनाईचे बादशाह उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना गुगलची डुडलद्वारे आदरांजली

शहनाईचे बादशाह उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना गुगलची डुडलद्वारे आदरांजली

मुंबई – प्रख्यात शहनाई वादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची आज १०२ वी जयंती आहे. या निमित्ताने माहितीचे महाजाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गूगलने डूडलच्या माध्यमातून आपल्या होमपेजवर बिस्मिल्ला खाँ यांना आदरांजली वाहिली आहे.

उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म २१ मार्च १९१६ रोजी बिहारमधील डुमरांवमध्ये झाला. कमरुद्दीन हे त्यांचे मूळ नाव होते. मात्र, पुढे त्यांच्या आजोबांनी ‘बिस्मिल्ला’ म्हणण्यास सुरुवात केली आणि पुढे त्याच नावाने जग त्यांना ओळखू लागले. धार्मिक सौहार्दाचे प्रतिक म्हणूनही बिस्मिल्ला खाँ यांना ओळखले जाते.
उस्ताद बिसमिल्ला खाँ यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित नेहरुंच्या उपस्थितीत शहनाईचे वादन केले होते. त्याचसोबत, कान्स आर्ट फेस्टिव्हल, ओसाका ट्रेड फेअर, वर्ल्ड एक्स्पोझिशन, वर्ल्ड म्युझिक इन्स्टिट्युट इत्यादी अनेक सोहळ्यांमध्येही त्यांनी शहनाई वादन केले आहे.
भारतास १९५० पासून आजपर्यंत प्रजासत्ताक दिनी त्यांच्या शेहनाई वादनाने(संग्रहीत संगिताने) कार्यक्रमाची सुरुवात केली जाते आहे. तसेच त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजे १९३७ साली कोलकात्यातील ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये सार्वजनिक व्यासपीठावरुन पहिल्यांदा शहनाईचे वादन केले. त्यानंतर त्यांनी वाद्यसंगीतात स्वत:ला झोकून दिले. ते आपल्या शहनाईला ‘बेगम’ म्हणत असत. २१ ऑगस्ट २००६ रोजी हृदयविकाराने बिस्मिल्ला खाँ यांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments