Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख‘अण्णा’ उशीरा सूचलेल शहाणपण!

‘अण्णा’ उशीरा सूचलेल शहाणपण!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल बिलासाठी एल्गार पुकारला.’’अण्णा देर आए दुरुस्त आए’,शेवटी दिल्लीत २३ मार्चपासून आंदोलन होणार आहे. लोकपाल बिलासाठी अण्णा हजारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ४२ पत्र लिहीले,परंतु पंतप्रधानांनी एवढ्या गंभीर विषयावर एकाही पत्राचे साधे उत्तर हजारेंना दिले नाहीत. यामुळे सरकारला किती गांभीर्य आहे. हे त्यांच्या व्यवहारावरुन दिसून येते. सत्ता मिळण्यापूर्वी भाजपाची मंडळी सत्ता मिळाल्यानंतर सर्वप्रथम लोकपाल विधेयक आणू अशा बाता मारल्या होते. परंतु सत्ता परिवर्तन होऊन चार वर्ष उलटले तरी सुध्दा लोकपाल विधेयकाच काहीही झालं नाही. काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपाच्या टेकुवर हजारेंनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर चार वर्षापूर्वी आंदोलन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. ‘मै भी अण्णा, ‘तु भी अण्णा! अशा पांढऱ्या टोप्या तरुण तरुणीच्या डोक्यात दिसत होत्या. तिरंगे झेंडे यामुळे एक क्रांती झाली की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. सरकार हे भ्रष्टाचारी आहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सत्तापरिवर्तन झाले आणि लोकपाल विधेयक लटकले. आता भाजपा सरकारलाही चार वर्ष उलटले तरी सुध्दा लोकपाल विधेयका बाबत ब्र सुध्दा कुणी काढायला तयार नाही. हजारे यांनीही त्या बाबत कडक भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली नव्हती.शेवटी हजारेंवर टीका झाल्यानंतर तसेच त्यांना संघाचा,भाजपाचा एजंट म्हणून टीका झाल्यानंतर हजारेंना जाग आली. आता २३ मार्च पासून पुन्हा भाजपा सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. परंतु काँग्रेसच्या विरोधात ज्यावेळी आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी जी गर्दी होती. जो काँग्रेस विरोधात राग होता तसाच रागव्देष दिसेल का? हाच खरा प्रश्न आहे. चोवीस तास माध्यमांमध्ये हजारे दिसत होते. त्यांना चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळाला होता. मात्र आता तसा कव्हरेंज मिळणार नाही. कारण सत्ताधाऱ्यांच्या हातात मीडियाची सुत्रे असल्यामुळे कुणीही त्यांना कव्हरेज देणार नाही. अशी भिती वाटत आहेत. निर्माण झाली. हजारे यांनी आंदोलनासाठी बसु नये अशी फिल्डींगही लावण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजारे यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा आटापिटा केला मात्र हजारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हुकूमशाहीकडे चाललेल्या या देशात चार वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसताना आता पोकळ आश्वासनांचा काय उपयोग, असा सवाल करून दिल्लीतील आंदोलन होणारच असल्याचे जाहीर करुन रनशिंग फुकले. परंतु हजारे यांच्या पत्रांना मोदींनी उत्तर न देता एकाप्रकारे अपमानच केला. शेवटी आंदोलनातून सरकारला कशा प्रकारे नांग्या टाकण्यात हजारे यशस्वी होतात हे काळ ठरवेल.

वैदेही ताम्हण
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments