नवी दिल्ली – ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांना छत्तीसगड पोलिसांनी धमकाविणे तसेच ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथून ही अटक करण्यात आली आहे.
वर्मा यांनी यापुर्वी बीबीसी, अमर उजाला सारख्या माध्यम संस्थामध्ये काम केले आहे. सध्या ते छत्तीसगड काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे प्रभारी आहेत. दरम्यान, वर्मा यांच्यावरील आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. वर्मा एका माजी मंत्र्याचा खुलासा करणार होते त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.