मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहनकरने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोत अदितीचे मोकळे सोडलेले केस, हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. काळ्या रंगाच्या आकर्षक स्लीव्हलेस टॉपमुळे अदितीची अदा मादक आणि तितकीच कातिलाना आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कधी ड्रेसवर, तर कधी साडी परिधान करत अदिती फोटोशूट करत असल्याचे पाहायला मिळते.मात्र अदितीचा फोटोमध्ये इतका हॉट आणि सेक्सी अंदाज रसिकांनी आजवर कधीही पाहिला नव्हता. सोशल मीडियावर सध्या अदितीचा हा सेक्सी लूक चर्चेचा विषय ठरला आहे. अदिती साध्या आणि पारंपरिक अंदाजात जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाज रसिकांना पसंत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.तिच्या या फोटोला खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.
तिचा हा सेक्सी लूक तिच्या आगामी सिनेमासाठी तर नाही ना अशीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एखाद्या फोटोशूटसाठी अदितीने हे फोटो काढल्याचेही बोललं जात आहे. काहीही असले तरी अदिती पोहनकरच्या या दिलखेचक अदा रसिक आणि तिच्या फॅन्सना आकर्षित करत आहेत.अदिती पोहनकर रितेश देशमुखसह ‘लयभारी’ या सिनेमात झळकली होती.अदितीने या सिनेमात साकारलेली भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते. इतकेच नव्हेतर तिला इम्फा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.’लयभारी’ या सिनेमातून रितेश आपल्या मराठीतल्या अभिनयाची नवी कारकीर्द सुरु केली होती.निशिकांत कामतने सिनेमाचं दिग्दर्शन केले होते.लयभारी सिनेमाच्या निमित्ताने रितेश आणि निशिकांतसह इतर कलाकरांचा मराठी बाणाही रसिकांना चांगलाच भावला होता. ‘लयभारी’ सिनेमाचे रसिक आणि समीक्षकांनी खूप कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर अदिती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येंतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळतेय. तिचे चाहते तिच्या सौदर्यांवरही घायाळ होत असल्याचे पाहायला मिळतंय. एकूणच आघाडीच्या इतर अभिनेत्रींसह सध्या अदिती पोहनकरचीही हवा आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.