Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशराहुल गांधी म्हणाले, 'हा' विधेयक संविधानावरील हल्ला

राहुल गांधी म्हणाले, ‘हा’ विधेयक संविधानावरील हल्ला

दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या विधेयकाचं समर्थन करणारे आपल्या देशाचा जो पाया आहे त्याच्यावरच हल्ला करत आहेत. अशा शब्दात राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. बुधवारी राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागणार आहेत. या विधेयकामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीनच शेजारी देशांतील अल्पसंख्याक व्यक्तींना नागरिकत्व दिले जाणार आहे. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही. धर्माच्या आधारे भेदभाव करणे हे संविधानविरोधी असल्याचा युक्तिवाद विरोधी पक्षांतील वक्त्यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments