गुजरात: गुजरात विधानसभेची निवडणूकांच्या तारखा बुधवारी जाहीर करण्यात आले. दोन टप्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्पा ९ डिसेंबरला तर दुसरा टप्पा १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. १८ डिसेंबरला मतमोजणी होईल. गुजरातमध्ये ४ कोटी ३३ लाख मतदार संख्या आहे. मतदानासाठी ५० हजार १२८ पोलिंग बुथवर व्यवस्था करण्यात आली. या निवडणूकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असून मतदारांना मतदान केल्यानंतर त्याची पोच मिळणार आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ए.के.जोती यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुजरात विधानसभा निवडणूक भाजपा आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या होमपीचर ही निवडणूक होणार असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.