Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशकरोनाच्या धसक्याने पंतप्रधान मोदींचा बेल्जियमचा दौरा रद्द

करोनाच्या धसक्याने पंतप्रधान मोदींचा बेल्जियमचा दौरा रद्द

नवी दिल्ली : कोरोनाच्या धास्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला बेल्जियमचा दौरा टाळला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जियमचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिली. पंतप्रधानांचा बेल्जियम दौरा रद्द करण्यात आला असून पुढील बेल्जियम दौऱ्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिली. भारत आणि युरोपीय संघाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी करोना विषाणूबाबत दिलेल्या माहितीनंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जियम दौरा रद्द करण्याच आल्याचे रवीश कुमार म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments