Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशकरोनाचा धसका : दिल्लीतील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद!

करोनाचा धसका : दिल्लीतील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद!

Manish Sisodia CoronaVirus,Manish Sisodia, CoronaVirus,Manish, Sisodiaनवी दिल्ली : करोना विषाणुच्या धसक्यामुळे दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. करोनाचे गांभीर्य लक्षात घेत दिल्ली सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील सर्वच प्राथमिक शाळा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी घेतला आहे. या बरोबरच दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक अटेंडन्सवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

मनीष सिसोदिया यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. दिल्ली सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा ३१ मार्च पर्यंत बंद असतील. याचाच अर्थ इयत्ता ५ वी पर्यंतच्या विद्यार्थी ३१ मार्चपर्यंत शाळेत जाणार नाहीत. दिल्ली सरकारचा हा निर्णय उद्या पासून अर्थात, शुक्रवार ६ मार्चपासून लागू होणार आहे. यात सरकारी, खासगी, अनुदानित आणि एनडीएमसी अशा सर्व शाळा बंद राहणार आहेत, असे सिसोदिया म्हणाले. आम्ही करोना विषाणूबाबत सर्वच शाळांना सूचना पाठवल्या असल्याचेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments