Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशपाटीदार 'फायरब्रॅंड'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, भाजपला धोक्याचा इशारा

पाटीदार ‘फायरब्रॅंड’चा सोशल मीडियावर धुमाकूळ, भाजपला धोक्याचा इशारा

अहमदाबाद – भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अहमदाबादमध्ये पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलची सभा झाली. फेसबुक युजर्सनी ही सभा रेकॉर्डब्रेक केली. मागच्या सभेच्या तुलनेत या सभेच्या फेसबूक लाईव्हला ५२ हजार ८०० व्हिवज् मिळाले. एका प्रकारे, नेटकरणींच्या प्रतिसादाने भाजपला धोक्याचा इशारा दिला आहे.

‘कोणाला मतदान करा हे सांगण्यासाठी येथे आलो नाही. मात्र आपण भाजपला निवडले तर आपल्या पाटीदार समाजाशी ती गद्दारी ठरेल, असे भावनिक साद हार्दिकने उपस्थितांना केले. जर तुम्ही भाजप व्यतिरिक्त कोणा दुसऱ्याला संधीच दिली नाही तर कोण चांगल, कोण वाईट हे समजणार कसे?  असा सवाल हार्दिक पटेलने विचारला. तसेच भाजपला धडा शिकवा, भाजपला मतदान करायचेच आहे तर ते २०२२ च्या निवडणुकांमध्ये करा, असे तो म्हणाला.
गुजरात निवडणुकांमध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले होते. मोदींच्या या वक्तव्याचा हार्दिकने यावेळी समाचार घेतला. गुजरात निडणुकीतून पाकिस्तानला काय मिळणार आहे?  गेल्या २२ वर्षांपासून विकासाची वार्ता करणारे पुन्हा त्यांच्या जुन्या राम मंदिराच्या मुद्द्यावर आले आहेत, आता ते विकासाबद्दल का बोलत नाही, असा टोला हार्दिकने लगावला. मागील आठवड्यातील सभेला २७ हजार व्हिवज् होते. फेसबुकनेही याची दखल खेत अमेरिकेहून निमंत्रण दिले आहे. आता अमेरिकाही आपली वयक्तिगत दखल घेत आहे, असा दावा हार्दिकने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments