Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशभारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिलेली नाही : डोनाल्ड ट्रम्प

भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिलेली नाही : डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारत दौ-यावर येत आहेत. मात्र त्याआधी ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. व्यापारी संबंधांच्या विषयात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिलेली नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प अँड्रूयूज येथील तळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘भारताकडून आम्हाला चांगली वागणूक मिळालेले नाही. मात्र, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर आवडतात’ असेही ट्रम्प म्हणाले. मात्र, मोदींचे कौतुक केले. भारत दौऱ्यावर जाण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ट्रम्प यांचा २४ फेब्रुवारीला दोन दिवसाचा भारत दौरा आहे. यावेळी ट्रम्प यांचा अहमदाबादमध्ये “एअरपोर्टपासून रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर स्टेडियमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ७० लाख लोक सहभागी होणार आहे. असं मला सांगण्यात आले असं ट्रम्प यांनी सांगितले. जगातील हे सर्वात मोठे स्टेडियम असल्याचे मला सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी भरपूर उत्साहित आहे. तुम्हा सर्वांनाही आनंद मिळेल” असे ट्रम्प म्हणाले.

कुक्कुटपालन, डेअरी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत जास्तीत जास्त प्रवेश मिळावा तसेच अन्य उत्पादनांवरील टॅक्स कमी व्हावा यासंबंधी ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात करार व्हावा यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही यामध्ये यश मिळालेले नाही. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments