Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशगुजरातचा विजय असामान्य - नरेंद्र मोदी

गुजरातचा विजय असामान्य – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – गुजरातचा विजय सामान्य नाही तर असामान्य आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निकालाचं विश्लेषण केलं आहे. भाजपाचा विजय ज्यांना मान्य नाही, त्यांच्यासाठी वेळ वाया घालवण्याची गरज नाही असंही ते म्हणाले आहेत.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. गुजरातमध्ये भाजपाला ९९ जागा मिळाल्या असून, हिमाचल प्रदेशात ४४ जागा जिंकल्या आहेत. विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपा मुख्यालयात पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

‘गुजरात आणि हिमाचलच्या जनतेचे आभार, त्यांनी विकासाचा मार्ग निवडला, यातूनच सामान्यांच्या समस्यांचं निराकरण होईल. जीएसटीमुळे भाजपचा पराभव होईल अशा अफवा होत्या, महाराष्ट्रात भाजपने जीएसटीनंतरच मोठं यश मिळवलं.  उत्तर प्रदेश निवडणूक सुरु होती तेव्हा जीएसटीमुळे पराभव होईल असा दावा करण्यात आला होता, गुजरातमध्येही हीच अफवा पसरवली गेली’, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments