आरूषी-हेमराज हत्याकांडप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात डॉ. राजेश व नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली. वर्ष २०१३ पासून डासना तुरूंगात ते शिक्षा भोगत आहेत. शिक्षेदरम्यान या दाम्पत्यांनी तुरूंगातील कैद्यांवर उपचार केले. या उपचारापोटी त्यांना मिळालेले ४९,५०० रूपये मानधन घेण्यास दोघांनी नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहेत.
या दाम्पत्याची आज (सोमवार) दुपारी तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. तलवार दाम्पत्यांकडून उपचार करून घेण्यासाठी तुरूंगात कैद्यांनी गर्दी केल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.