Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशमुख्यमंत्री केजरीवालांच्या सिंदखेडराजा सभेला बंदी

मुख्यमंत्री केजरीवालांच्या सिंदखेडराजा सभेला बंदी

बुलडाणा – १२ जानेवारीला सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती लावण्यासाठी चढाओढ सुरु आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. याच दृष्टीने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालही सिंदखेडराजा येथे जाहीर सभेसाठी येणार होते, अशी माहिती आम आदमी पक्षाकडून देण्यात आली होती. मात्र त्यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.

जिजाऊंचा जन्मोत्सव सिंदखेडराजा येथे १२ जानेवारीला साजरा करण्यात येतो. दरवर्षी ५ ते ६ लाख लोक या कार्यक्रमाला येत असतात. त्यामुळे अधिक गर्दीच्या कारणावरून पोलिसांनी सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या केजरीवाल यांच्या जाहीर सभेला परवानगी नाकारली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments