Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशकॉंग्रेसचा दलितांवर नाही केवळ ‘डील’वर विश्वास : मोदी

कॉंग्रेसचा दलितांवर नाही केवळ ‘डील’वर विश्वास : मोदी

कर्नाटक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढविला. मोदींनी राहुल गांधी आणि कॉंग्रेसला लक्ष्य करताना, ‘काँग्रेसला दिल (मन) किंवा दलितांची नव्हे, तर केवळ डिलची (व्यवहार) चिंता आहे,’ असा हल्ला चढवला. काँग्रेस कधीच दिलवाली नव्हती. ती दलितवालीही नव्हती. केवळ डीलवाली होती, त्यामुळे आता काँग्रेसला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असं मोदी यांनी आवाहान केले.

‘जो पक्ष गरिबांचं ‘वेल्फेअर’ करू शकत नाही, त्या पक्षाला जनतेने ‘फेअर वेल’ दिला पाहिजे,’ असा टोलाही मोदींनी लगावला. आज चित्रदुर्गमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. ‘काँग्रेस ना दिलवाली आहे, ना दलितवाली, फक्त डीलवाली आहे,’ अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘ज्यांची जयंती साजरी करायला हवी, त्यांची जयंती काँग्रेस पक्ष साजरी करत नाही. वीरा मरकडी यांना काँग्रेस विसरली असून मतांसाठी सुलतानांची जयंती साजरी करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ‘दलित आईच्या पोटी जन्माला आलेल्या थोर वीरांगना वीरा मरकडी यांना मी वंदन करतो. त्यांच्याकडून आपण शौर्य आणि साहस शिकायला हवं, असं मोदी म्हणाले.

भाजपा लोकांच्या भावना समजून घेतं, आमचं सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, मी दलितांच्या विकासाबाबत विचार करतो. तुमच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी मी कटिबद्द असेल असं मोदी पुढे म्हणाले. जो पक्ष गरिबांचं वेल्फेअर करत नाही, त्या पक्षाला जनतेनं फेअरवेल द्यावं, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments