Sunday, May 26, 2024
Homeदेशपटेलांना आरक्षणासाठी काँग्रेसचे तीन पर्याय

पटेलांना आरक्षणासाठी काँग्रेसचे तीन पर्याय

महत्वाचे….
१.शिक्षण संस्था, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत काँग्रेसने दिले तीन पर्याय २.पर्याय स्पष्ट करण्यात आले नाही. ३. कायदे तज्ञांशी चर्चा करुन होणार शिक्कामोर्तब


अहमदाबाद:  हार्दिक पटेल याच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीला भेटीवेळी आरक्षणबाबत तीन पर्याय काँग्रेसने दिले आहेत. काँग्रेस नेत्यांनी समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कायदे क्षेत्रातील जाणकार तसेच इतर नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे पाटीदार अनामत आंदोलन समितीने स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. पटेलांना शिक्षण संस्था, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत काँग्रेसने आम्हाला तीन पर्याय दिले आहेत, असे समितीचे निमंत्रक दिनेश बांभानिया यांनी सांगितले. मात्र हे पर्याय कोणते हे त्यांनी स्पष्ट केले नाही. हार्दिकशी चर्चा करेपर्यंत हे पर्याय गुप्त ठेवले जातील, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या आरक्षणला कोणताही धक्का लावला जाणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केल्याचे बांभानिया यांनी स्पष्ट केले. आर्थिक आधारावर आरक्षणाचा पर्याय आम्ही फेटाळून लावला आहे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीतून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा चर्चा होईल असे सिब्बल यांनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आरक्षण कशा प्रकारे देता येईल याची चर्चा समितीच्या सदस्यांनी काँग्रेस नेत्यांशी केली. काँग्रेसने शैक्षणिक संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचे आश्वासन दिल्यासच काँग्रेसला पाठिंबा दिला जाईल अशी भूमिका हार्दिकने घेतली होती. चर्चेवेळी मात्र तो उपस्थित नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments