Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशमुख्यमंत्र्यांनी पाहुणचारावर केला ६८ लाखाचा चुराडा!

मुख्यमंत्र्यांनी पाहुणचारावर केला ६८ लाखाचा चुराडा!

नवी दिल्ली: त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यापासून पाहुण्यांच्या चहा-नाष्ट्यावर सरकारी तिजोरीतून आत्तापर्यंत तब्बल ६८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही धक्कादायक माहिती एका आरटीआयमधून समोर आली आहे. केवळ ११ महिन्यांच्या आपल्या कार्यकाळात एवढ्या पैसाचा चुराडा केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नैनीताल येथे राहणारे आरटीआय कार्यकर्ते हेमंत सिंह गौनियां यांच्या आरटीआयमधून पाहुणचारासाठी खर्च झालेला सरकारी निधीचा हा धक्कादायक आकडा समोर आला आहे. हेमंत गौनियां यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवली होती की, मुख्‍यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून आजपर्यंत चहा-पाण्यावर सरकारने किती खर्च केला आहे.
यावर सचिवालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले की, रावत यांनी १८ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून पाहुण्यांच्या चहा-पाण्यावर आजपर्यंत सरकारी तिजोरीतून एकूण ६८,५९,८६५ रुपये खर्च करण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला होता. त्यानंतर १९ वर्ष आरएसएसचे प्रचारक असलेले त्रिवेंद्र रावत यांनी १८ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments