Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशकेंद्र सरकारची आता NPR ला मंजुरी

केंद्र सरकारची आता NPR ला मंजुरी

increase-in-inflation-allowance-of-central-employeesनवी दिल्ली :  देशभरात नॅशनल रजिस्ट्रर ऑफ सिटीझन्स (NRC) आणि सिटिझनशिप अॅमेंडमेंट अॅक्ट (CAA) यावरुन देशभरात गोंधळ सुरु आहे. मात्र हे सुरु असतांना केंद्र सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) अद्ययावत करण्यास मंजुरी दिली आहे.

जनगणनेची प्रकिया इंग्रजांच्या काळापासून सुरु आहे. ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. NPR चं काम सहा महिने चालणार. यासाठी एक अॅप तयार करण्यात आलं असून लोकसंख्या अद्ययावत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

२०१० मध्ये जनगणना झाली होती. आता १० वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये पुन्हा एकदा जनगणना केली जाणार आहे. देशातली १६ वी जनगणना केली जाणार. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ८ व्यांदा जनगणना केली जाणार आहे असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments