Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशदिलदारी : कोरोनाग्रस्तांसाठी कुस्तीपटू बजरंग पुनियाचा मदतीचा हात

दिलदारी : कोरोनाग्रस्तांसाठी कुस्तीपटू बजरंग पुनियाचा मदतीचा हात

bajrang punia announced he is giving six month salary in corona relief fundनवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. कोरोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. ऑलिम्पिक स्पर्धादेखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. या दरम्यान कोरोनाग्रस्तांसाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मदतीचा हात दिला आहे. बजरंग पुनियाने आपले सहा महिन्यांचे वेतन हरयाणा सरकारच्या करोनाग्रस्तांच्या मदत निधीमध्ये दान केले आहे. ट्विटरवरून त्याने याबाबत घोषणा केली. सर्वत्र पुनियाचा कौतूक होत आहे.

कोरोना व्हायरसने लाखो लोकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र कोरोनाचा हा भूत नागरिकांच्या मानगूटीवरुन कधी जाईल याचीच सर्वांना चिंता लागलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments