Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशअशोक गहेलोत म्हणाले, राजस्थानात CAA आणि NRC लागू करणार नाही

अशोक गहेलोत म्हणाले, राजस्थानात CAA आणि NRC लागू करणार नाही

Ashok Gehlotराजस्थान :  नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ) आणि राष्ट्रीय नोंदणी नागरिक ( NRC )  लागू करणार नाही. असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांनी रविवारी जाहीर केले. रविवारी जयपूरमध्ये संविधान बचाव शांती मार्च काढल्यानंतर याठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री गहेलोत बोलत होते. आसाममध्ये NRC अयशस्वी झाली. १६ लाख हिंदू बाहेर झाले. आता CAA आणले. अशीही टीका गहेलोत यांनी केली.


मुख्यमंत्री गहेलोत म्हणाले, बहुमताने कायदा आणू शकता परंतु लोकांची मनं जिंकू शकत नाही. बिहारचे आणि मुख्यमंत्री ओडिशाचे मुख्यमंत्री यांनी सुध्दा विधेयकाला संसदेत पाठिंबा दिला परंतु त्यांच्या राज्यात NRC लागू करणार नाहीत. राजस्थान सरकार जनभावना समजून हे दोन्ही कायदे लागू करणार नाही. असेही अशोक गहेलोत म्हणाले.

सध्या देशभरात दोन्ही कायद्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. तरुण, विद्यार्थी, विद्यार्थीनीही रस्त्यावर उतरले आहेत. ब-याच ठिकाणी जाळपोळ हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. जवळपास २१ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात मोर्चे आणि निदर्शने सुरुच आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments