Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशहैदराबादच्या प्रचारात PM मोदींना उतरवाच; ओवेसींचे आव्हान

हैदराबादच्या प्रचारात PM मोदींना उतरवाच; ओवेसींचे आव्हान

हैदराबाद l ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. हैदराबादचे खासदार आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisi यांनी भाजप BJP नेत्यांना आव्हान दिले आहे. हैदराबाद महापालिका निवडणुकीत पंतप्रधान मोदींना प्रचारात उतरवाच, मग बघा भाजप किती जागा किती जागा जिंकतो ते, असं ओवेसी म्हणाले.

तुम्ही पंतप्रधान मोदींना जुन्या हैदराबामध्ये आणून प्रचार करा. काय होते ते पाहूया? त्यांच्या सभा आणि बैठका आयोजित करा. आम्हीही पाहा भाजप किती जागा जिंकतो ते?, असं एका सभेला ओवेसी म्हणाले, ही महापालिका निवडणुका आहेत, तरीही ते विकासाबद्दल काही बोलणार नाहीत.हैदराबाद हे एक विकसित शहर बनले आहे. येथे अनेक मोठ्या कंपन्या शहरात आहेत. पण भाजप हैदराबादचे ब्रँड नेम खाली आणून तो नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप ओवेसींनी केला.

वाचा l Disha Salian l दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची याचिका न्यायालयानं फेटाळली

हैदराबाद निवडणुकीत पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्र्यांसह आणि दिग्गज नेत्यांची फौज उतरण्याचा भाजपचा विचार आहे. यापार्श्वभूमीवर हैदराबादचे चार वेळा खासदार असलेल्या ओवेसी यांनी पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे. याशिवाय मतदार मतदारांचं ध्रुवीकरण करण्याचं काम भाजप करत आहत. यामुळे भाजप नेते निवडणुकीत जुन्या हैदराबादमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याचा इशारा देत आहेत.

जुन्या हैदराबाद शहरात विदेशी बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या घुसखोर आहेत. हैदराबाद महापालिकेत सत्ता आल्यास शहरात अवैधरित्या राहणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राइक होईल आणि विदेशी घुसखोरांना बाहेर केले जाईल, असं तेलंगण भाजपचे प्रदेशाध्यक्ष बांदी संजय अलिकडेच म्हणाले होते.

वाचा l Nokia 2.4 लाँच, जाणून घ्या किंमत-फिचर्स

बेंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्य यांनी खासदार ओवेसी यांचा उल्लेख मॉडर्न जिन्ना असा केला होता. हैदराबादमधील हजारो विदेशी घुसखोरांना त्यांचा ओवेसींचा पक्ष सुरक्षा देतोय, असा आरोप तेजस्वी सूर्या यांनी केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments