Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेश'या' वस्तीत भाजप नेत्यांना 'नो एन्ट्री'

‘या’ वस्तीत भाजप नेत्यांना ‘नो एन्ट्री’

BJP, bjp leadersअलाहबाद : शिवकुटी वस्तीतील लोकांनी आपल्या घरासमोर भाजप नेत्यांना प्रवेश निषेध लिहिलेले फलक लावले आहेत. “या वस्तीत भाजप नेते व कार्यकर्त्यांना प्रवेश निषेध आहे, कारण येथे महिला व मुली राहतात,” असा संदेश लिहिलेले फलक प्रत्येक घरासमोर चिकटवलेले बघायला मिळत आहेत.

महिला व मुलींवर होत असलेले अत्याचार थांबवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी आपल्या घरासमोर निषेध दर्शवणारे फलक लावले आहेत. या फलकांद्वारे त्यांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांना वस्तीत शिरण्यास मनाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments