पानीपत- मुख्यमत्री मनोहरलाल यांनी रविवारी मोठा प्रशासकिय फेरबदल करताना १३ आयएएस अधिकाऱ्याचे काम आणि जबाबादाऱ्यामध्ये फेरबदल केला. चर्चेतील आयपीएस डॉ. अशोक खेमका याच्या २६ वर्षाच्या करियरमध्ये ५१ वा फेरबदल करण्यात आला आहे. तसेच, राज्याचे सचिव डीएस ढेसी यांच्याकडून विजिलंन्सचा चार्ज काढून कोऑपरेटिव डिपार्टमेंटचे अतिरिक्त मुख्य सचिव नवराज संधू यांना सोपवण्यात आला आहे.
खेमका यांना डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्प्लॉयमेंटवरून हटवून डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट अँड यूथ अफेयर्सचे मुख्य सचिव बनवण्यात आला आहे. स्पोर्ट डिपार्टमेंटचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. केके खंडेलवाल यांच्याकडे आता एजुकेशन डिपार्टमेंटची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यामुळे खेमका पुन्हा आरोग्य मंत्री अनिल विज यांच्यसोबत आले आहेत.
हा स्वार्थाचा विजय आहे… – खेमका
खेमका यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, खूपमोठे काम प्लॅन करून ठेवले होते. परंतु, बदलीची बातमी क्रॅश लॅंडिगप्रमाणे आली. हीच अपेक्षा होती. हा स्वार्थाचा विजय आहे. परंतु, हे तात्पूरते आहे. नवी स्फूर्ती आणि नवीन उर्जा घेऊन मी काम चालूच ठेवणार आहे.
मुख्य सचिव ढेसीच्या बदलीचा निर्णयाने चकित
मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी मुख्य सचिव डीएस ढेसी यांच्याकडून विजिलंन्स चार्ज काढून घेऊन चकित केले आहे.
सुत्रांनी सांगितले की, हरियाणामध्ये १९८८-८९ पर्यंत विजिलंन्सची जबाबदारी गृह सचिवाकडे राहत होती. त्यानंतर हा चार्ज मुख्य सचिवाकडे सोपवण्यात आला. मध्ये एकदा हा चार्ज प्रिंसिपल सेक्रेटरीकडे सुध्दा गेला होता.
मुख्यमंत्र्या इच्छा आहे की, हरियाणामध्ये विजिलंन्स डिपार्टमेंटला स्वतंत्र स्वरूपात चालवण्यात यावे, यामुळे सरकारच्या कामावर प्रभाव पडू नये.
वृद्धांची पेंशन थांबवल्यानंतर बदली नक्की होती
अशोक खेमका आपल्याच मंत्र्याशी विरोधाचे शिकार झाले आहेत. त्यांनी सप्टेंबरमध्ये मोठ्या घोटाळ्याच्या शंकेने ३.२१ लाख वृद्धांची पेंशन थाबवली होती. यामुळे मुख्यमंत्री आणि विभागीय राज्यमंत्री कृष्ण कुमार बेदी यांना राजकीय संकटाचा सामना करावा लागला होता. यानंतर खेमका यांनी अंबालाच्या डीएसडब्लूओ ऑफिसची गाडी मंत्री कार्यालयात वापरल्याने पत्र पाठवून प्रश्न उपस्थित केले होते, तेव्हापासून बेदी आणि खेमका याच्यातील वाद आणखी वाढला होता. पत्र माध्यमात आल्याने बेदी तेव्हा नाराज झाले होते.