Friday, June 21, 2024
Homeआरोग्यअति पिकलेली केळी खावीत का ?

अति पिकलेली केळी खावीत का ?

अनेकदा आठवडाभराच्या भाज्या आणि फळं ही एकत्र विकत घेतली जातात. केळ्यासारखी फळं पटकन पिकतात. मग अशी अति पिकलेली फळं खाणं पोषणद्रव्यांच्यादृष्टीने आहारात घेणं गरजेचे आहे. याबाबत विविध आहारतज्ञ काय म्हणतात…

तज्ञांच्या सल्ल्यानुसार, फळं जशी पिकत जातात तशी त्यामधील पोषकतादेखील बदलते. मग पहा अति पिकलेल्या केळ्यामध्ये नेमकी पोषकता किती असते ?

कार्बोहायाड्रेट्स  – जसे केळ पिकते तसे त्यामधील स्टार्चचे प्रमाण बदलते. कच्च्या केळ्यामध्ये कॉम्पेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. पण स्टार्चचे रूपांतर साखरेत होते. मधूमेहींनी अति पिकलेली केळी टाळावी. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

कॅलरीज –  अति पिकलेली आणि कच्ची केळी यामधील कॅलरीजचे प्रमाण सारखेच असते. फळामधील कॅलरी काऊंटचा विचार केला असता, इतर फळांच्या तुलनेत केळ्यामध्ये अधिक कॅलरीज असतात.

अ‍ॅन्टीऑक्सिडंट – जेव्हा केळं पिकायला लागत तेव्हा त्यामधील काही घटकांचे रूपांतर अ‍ॅन्टीऑक्सिडंटमध्ये होते. परिणामी केळी पिकताना त्यावर ब्राऊन डाग पडतात. जर तुम्ही स्मुदी बनवत असाल तर त्यामध्ये अति पिकलेली केळी वापरा. यामुळे साखरेचा वापर करावा लागत नाही.

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स – अति पिकलेल्या केळ्यामध्ये मायक्रो न्युट्रिएंट्स कमी असतात. फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी, थायमिन असे वॉटर सोल्युबल घटक अधिक असतात.

केळं कच्च असो वा पिकलेलं त्यामध्ये मुबलक पोटॅशियम घटक असतात. त्यामुळे  मधूमेहींचा अपवाद वगळता अति पिकलेली केळी खाण्यात काहीच तोटा नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments