Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेश'सोन्याच्या चमच्यासह जन्मलेल्यांना गरिबी काय कळणार!

‘सोन्याच्या चमच्यासह जन्मलेल्यांना गरिबी काय कळणार!

Narendra Modi, Gujarat, Gujarat Polls, Modi,अहमदाबाद: गुजरात निवडणुकीतील आपल्या सभांमधून सतत काँग्रेसवर हल्ले करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या नेत्याला गरिबी काय असते हे काय माहिती असणारअशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.
गुजरात निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सोमवारी पाटण येथे झालेल्या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांमध्ये जाऊन कृषी महोत्सव आयोजित करतो. आम्ही श्रीमंतांची मदत करत नाही. उन्हाळ्याच्या काळात मी पालकांकडे जाऊन आपल्या मुलांना शिक्षण द्या असे आवाहन करतो. ती काय अंबानींची मुलं आहेत? नाही. ती गरिबांची मुलं आहेत. परंतु, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना गरिबी काय असते हे कसे कळू शकेल?
मोदी पुढे म्हणाले की, ‘जेव्हा या भागात पूर आला तेव्हा मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, आणि मंत्री इथे आले आणि लोकांसोबत उभे राहिले. मी स्वत: इथे आलो आणि परिस्थितीचा आढावा घेतला. याच काळात काँग्रेसचे नेते आणि सर्व आमदार मात्र एका रिसॉर्टमध्ये मजा करत होते. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत काँग्रेस पक्ष पराभूत झाला आहे, इथले लोक भाजपलाच सहकार्य करतील याची पक्की खात्री असल्याने आता काँग्रेस दुसऱ्या टप्प्यातील मतदानाबाबत विचारच करत नाही, असेही मोदी पुढे म्हणाले. आता ते विविध कारणे सांगालयाला लागले आहेत. काँग्रेसचे नेते आणि चिअरलिडर्स आता ईव्हीएम मशीनवरच प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले आहेत, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments