Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeदेशराहुल यांचा पुन्हा मोदींना प्रश्न; गुजरातवर २६ टक्के कर्ज कसे वाढले?

राहुल यांचा पुन्हा मोदींना प्रश्न; गुजरातवर २६ टक्के कर्ज कसे वाढले?

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातमधील भाजपच्या २२ वर्षांचा हिशोब मागत राहुल गांधी यांनी गुरुवारी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी गुजरातवरील कर्जाबाबत पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारला आहे. राहुल यांच्या प्रश्नामुळे पंतप्रधान मोदी कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, १९९५ मध्ये गुजरातवर ९ हजार १८३ कोटी रुपये कर्ज होते. आता २०१७ मध्ये गुजरातवर २ लाख ४१ हजार कोटीचे कर्ज आहे. म्हणजे प्रत्येक गुजराती नागरिकांवर ३७ हजार रुपयांचे कर्ज आहे. या आकडेवारीला समोर ठेऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना आर्थिक व्यवस्थापनातील चुका आणि प्रसिद्धीची शिक्षा गुजरातच्या जनतेने का फेडायची? असा प्रश्न केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments