Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeदेशगुजरातमध्ये अपघात: ट्रकने फुटपाथवर झोपलेल्या 15 मजुरांना चिरडले

गुजरातमध्ये अपघात: ट्रकने फुटपाथवर झोपलेल्या 15 मजुरांना चिरडले

सूरत: गुजरातच्या सुरतमध्ये मोठा अपघात घडला आहे. कोसांबामध्ये एका ट्रकने 15 जणांना चिरडले. पोलिसांनी सांगितले की, सर्व मजूर होते आणि राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील रहिवासी होते.

सोमवारी रात्री किम-मांडवी मार्गावरीस पालोडगाम जवळ ही दुर्घटना घडली. फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबाला ट्रकने चिरडले. यामध्ये 15 मजुर जागीच ठार झाले. 6 जणांना गंभीर स्थितीत रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालक आणि क्लिनरला अटक केली आहे.

मृतांमधील राकेश रूपचंद घटनास्थळापासून जवळच असलेल्या एका दुकानात काम करत होता. तो दररोज दुकानाजवळील एका केबिनमध्ये झोपायचा. मात्र सोमवारी केबिनऐवजी तो मजुरांसोबत फुटपाथवर झोपला आणि त्याच्यावर काळाने घाला घातला. ट्रकच्या धडकेत 4-5 दुकानांचे शेड देखील तुटले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, ट्रकची ऊसाच्या ट्रॅक्टरसोबत धडक झाली. या धडकेनंतर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक फुटपाथवर गेला. सूरतमधील पलोड गावाच्या जवळ असणाऱ्या किम मांडवी रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

किम हाकर मार्गाजवळ एका ट्रकचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रात्री बारानंतर झालेल्या या अपघातामध्ये ट्रक एका ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकला. मांडवीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रॅकवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचा चालक आणि क्लिनरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments