Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशगांजाच्या रोपासोबत सेल्फी भोवला

गांजाच्या रोपासोबत सेल्फी भोवला

चेन्नई: आपण काय करतोय याचं भान नसेल तर सेल्फीला दिलेली पोज तुरुंगात नेऊ शकते याचा अनुभव चेन्नईतल्या दोन तरूणांना आला आहे. गो ग्रीन, पर्यावरणाची काळजी घ्या, झाडे लावा झाडे जगवा असा समाजोपयोगी संदेश चेन्नईतला ससीकुमार नावाचा एक तरूण देत होता. त्यासाठी त्यानं आपला मित्र कमाल याच्या टेरेस गार्डनमधले रोपांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

कमालने रोयापेटामधल्या आपल्या टेरेस गार्डनमध्ये अनेक झाडंदेखील लावली. कमालनं बजावूनही ससीकुमारनं सेल्फी काढले आणि कमालला न सांगता ते शेअर केले व त्याला टॅगही केलं. विशेष म्हणजे ज्या रोपांसोबत फोटो काढले ती गांजा किंवा मारिजुआना ही ड्रग्ज ज्यापासून बनवतात अशा अफूच्या रोपांचे होते. नीलम बाशा दर्गा स्ट्रीटवरील कमाल (वय 35) असं या तरूणाचं नाव आहे. त्याच्यासोबत सेल्फी घेऊन फेसबुकवर टाकलेल्या ससीकुमार (वय 22) या त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केलं.

सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा झाली आणि हे कुठलं ठिकाण आहे याची विचारणा व्हायला लागली. रोयापेटामधल्या पोलिसांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी ससीकुमारला आधी व नंतर कमालला अटक केली. न्यायाधीशांनी दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अमली पदार्थांच्या रोपांसंदर्भात पोलिासांनी आणखी काही जणांना अटक केली आहे.

यामध्ये एस मूर्थी या 55 वर्षांच्या इसमाचा समावेश आहे. कमी वावर असलेल्या गल्ल्यांमध्ये रस्त्याच्या कडेला मूर्थी अफूची झाडं उगवायचा.काही मित्रांना तो गांजाही द्यायचा. परंतु एकदा त्यानं मित्राला गांजा द्यायचं नाकारल्यावर तो राग मनात धरून त्या मित्रानं मूर्थीचं रहस्य पोलिसांना सांगितलं आणि मूर्थी गजाआड झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments