Friday, June 21, 2024
Homeदेशहिंदू दहशतवाद: कमल हासनविरुद्ध गुन्हा दाखल

हिंदू दहशतवाद: कमल हासनविरुद्ध गुन्हा दाखल

‘हिंदू दहशतवादा’संदर्भात लिखाण करणारे अभिनेते कमल हासन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर उद्या (शनिवार) कोर्टात सुनावणी होणार आहे. ‘आनंद विकटन’ या तामिळ साप्ताहिकात लिहिलेल्या लेखाच्या आधारे कमल हासन यांच्यावर कलम ५००, ५११, २९८, २९५ (ए) आणि ५०५ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमल हासन यांनी आपल्या लेखात लिहिले आहे की, यापूर्वी हिंदू दक्षिणपंथी गट हिंसेत सहभागी होत नसत. ते आपल्या युक्तिवादाने विरोधी पक्षांशी चर्चा करत असत. परंतु, आता ही जुनी पद्धत संपुष्टात आली आहे आणि धाकदपटशा दाखवला जात आहे. आता ते हिंसेत सहभागी होत आहेत. हिंदू दक्षिणपंथी आता हिंदू दहशतवादाला आव्हान देऊ शकत नाहीत. याचे कारण म्हणजे हा दहशतवाद आता त्यांच्या कॅम्पातही घुसला आहे.

कमल हासन यांच्या हिंदू दहशतवादाबाबतच्या वक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसह इतर अनेक हिंदू संघटनांनी टीका केली आहे. केरळमध्ये मुस्लीम कट्टरतावादी संघटना रडावर आल्यानंतर कमल हासन यांनी हे लिखान केले आहे असे भाजप नेता सुब्रमण्यन स्वामी यांनी म्हटले होते. इतकेच नाही तर, कमल हासन यांनी हिंदू समाजाचा अपमान केला असून त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे असे विनय कटियार यांनीही म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments