Thursday, September 12, 2024
Homeदेशमोदींची नक्कल केल्याने श्यामची ‘द ग्रेट शोमधून हकालपट्टी?

मोदींची नक्कल केल्याने श्यामची ‘द ग्रेट शोमधून हकालपट्टी?

नवी दिल्ली: स्टार प्लस वाहिनीवरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोचे नवीन पर्व सुरू झाल्यापासून तो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करण्यात प्रसिद्ध असलेल्या कॉमेडीयन श्याम रंगीलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या मंचावर मोदींची हुबेहूब नक्कल करताना पाहायला मिळतो. मात्र, वाहिनीने रेकॉर्ड केलेला हा भाग प्रसारित करण्यास नकार देत कार्यक्रमातून त्याची हकालपट्टी केल्याचा आरोप त्याने केला आहे.

‘द वायर’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत श्याम रंगीलाने हे आरोप केले आहेत. त्याने म्हटले की, ‘मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करतानाचा हा भाग चित्रीत झाल्यानंतर जवळपास एक महिन्यांनंतर मला कार्यक्रमाच्या प्रॉडक्शन टीमकडून फोन आला. त्यांनी मला पुन्हा नव्याने चित्रीकरणासाठी बोलावले. मोदींची नक्कल करतानाचा भाग प्रसारित न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता मात्र मोदींची नाही असे मला वाहिनीकडून सांगण्यात आले.’

या कार्यक्रमासाठी स्पर्धकांना ऑडिशन द्यावी लागते. पण, नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांची हुबेहूब नक्कल करतानाचे श्याम रंगीलाचे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला थेट कार्यक्रमात सहभागी होण्यास निमंत्रण दिले गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments