लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही Ford Ecosport च्या रेंजला अपडेट करण्याच्या तयारीत आहे. लवकरच कंपनी भारतीय बाजारात Ecosport एसयूव्ही दोन नवीन व्हेरिअंट्स ‘S’ आणि ‘SE’ मध्ये सादर करेल. कंपनीने दोन्ही व्हेरिअंट्ससाठी एक टीझरही जारी केले आहे. हे टीझर पोस्टर कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन फिल्मी स्टाइलमध्ये रिलीज केलंय. Ecosport च्या टीझरमध्ये प्रसिद्ध हिंदी सिनेमा करण-अर्जुनमधील एक डायलॉग आहे. यात “मेरे ‘S’ और ‘SE’ आएंगे” असं कंपनीने नमूद केलंय. जाणून घेऊया या SUV मध्ये काय आहे खास
इकोस्पोर्टसाठी लवकरच दोन नवीन व्हेरिअंट लाँच होणार आहेत. पण, कोणत्या तारखेला लाँच होणार याची मात्र अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी 3 मार्च रोजी दोन व्हेरिअंट लाँच होऊ शकतात. कंपनीने EcoSport SE व्हेरिअंटमध्ये नेहमीच्या मॉडेलपेक्षा काही बदल केलेत. नंबर प्लेटला टेलगेटजवळ जागा मिळाली आहे, तर मागच्या बंपरवर सिल्वर कलरमध्ये फॉक्स बॅश प्लेट दिली आहे. याशिवाय नवीन व्हेरिअंटची किंमत सध्याच्या टायटेनियम आणि स्पोर्ट्स ट्रिमच्या मधोमध असण्याची शक्यता आहे.
Two’s always better than one. Coming soon #FordEcoSportSE, same-same but a different avatar of Ford EcoSport S.#StayTuned pic.twitter.com/GQHAtvcmW9
— Ford India (@FordIndia) March 1, 2021
मिळणार खास फिचर्स
प्रोजेक्ट हेडलॅम्प, LED डे टाइम रनिंग लाइट्स, क्रूज कंट्रोल, 8 इंच ट्च स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, की-लेस एंट्री, टायर प्रेशन मॉनिटरिंग सिस्टिम, , हायलोजन टेललाइट्स आणि पंक्चर रिपेअर किट यांसारखे फिचर्स असू शकतात.
इंजिन क्षमता
कंपनी नवीन व्हेरिअंटमध्ये इंजिनमध्ये बदल करणार नसल्याचं समजतंय. त्यामुळे ही एसयूव्ही आधीप्रमाणेच दोन इंजिन पर्यायांसह बाजारात दाखल होईल. यातील एका व्हेरिअंटमध्ये 1.5 लिटर नॅचरल अॅस्पायर्ड इंजिन आहे, हे इंजिन 123 PS पॉवर आणि 149 Nm टॉर्क जनरेट करतं. तर, दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये 1.5 लिटर क्षमतेचं टर्बो चार्ज डिझेल इंजिन आहे, हे इंजिन 100 PS पॉवर आणि 215 Nm टॉर्क जनरेट करतं.