skip to content
Friday, May 24, 2024
Homeव्यापारVodafone Idea ची 'ही' नवीन ऑफर

Vodafone Idea ची ‘ही’ नवीन ऑफर

1.5GB च्या डेटा प्लॅनमध्ये आता दुप्पट डेटा

vodafone-idea-now-offers-double-data-benefits-on-rs-249-rs-399-and-rs-599-prepaid-plans
vodafone-idea-now-offers-double-data-benefits-on-rs-249-rs-399-and-rs-599-prepaid-plans

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने (Vi) आपल्या युजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे. आतापर्यंत Vi आपल्या दररोज 2 जीबी डेटा प्रीपेड प्लॅन्समध्ये दुप्पट डेटा ऑफरअंतर्गत दररोज 4 जीबी डेटा देत होती. पण आता कंपनीने दररोज 1.5 जीबी डेटा देणाऱ्या प्लॅन्समध्येही डबल डेटाची ऑफर सुरू केली आहे.

या प्लॅन्समध्ये मिळेल दररोज 3GB डेटा 
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दुप्पट डेटाची ऑफर मिळतेय. हे तिन्ही प्लॅन रोज 1.5 जीबी डेटाचे असून ऑफरअंतर्गत यामध्ये आता ग्राहकांना रोज 3 जीबी डेटा मिळत आहे.

हे तिन्ही प्लॅन अनुक्रमे 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतात. मात्र, Vi ची ही ही ऑफर सध्या काही सर्कलमध्येच उपलब्ध आहे, पण लवकरच देशभरात सर्व सर्कलमध्ये ही ऑफर लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तिन्ही प्लॅन्समध्ये दररोज मिळणाऱ्या डेटाशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सेवा मिळते.

तसेच, Vi Movies & TV Classic चं मोफत सब्स्क्रिप्शन, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Binge All Night ची सुविधाही मिळते. वीकेंड डेटा रोलओव्हरअंतर्गत सोमवार ते शुक्रवारपर्यंत न वापरलेला डेटा शनिवारी-रविवारी वापरता येतो. तर, बिंज ऑल नाइटअंतर्गत रोज रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटाचा वापर करता येतो.

या प्लॅन्समध्ये आधीपासूनच मिळतोय दुप्पट डेटा 
व्होडाफोन-आयडिया आधीपासूनच आपल्या रोज 2 जीबी डेटा देणाऱ्या तीन प्रीपेड प्लॅनमध्ये दुप्पट डेटाची सेवा देत आहे. 299 रुपये, 449 आणि 599 रुपयांच्या तीन प्लॅनमध्ये ही ऑफर मिळते. या तिन्ही प्लॅन्सची वैधता अनुक्रमे 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवस आहे. दुप्पट डेटा ऑफरअंतर्गत या तिन्ही प्लॅन्समध्ये दररोज 4 जीबी डेटा मिळतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments