Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeआरोग्यवजन कमी करायचे असेल तर?

वजन कमी करायचे असेल तर?

आपल्या कोणत्याही गरजांसाठी प्राण्यांपासून मिळणारे कुठलेही उत्पादन न वापरणाऱ्या लोकांना वेगन म्हणतात. अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी वेगन बनणे हा अत्यंत सोपा उपाय आहे. शाकाहाराचा अवलंब करणारे लवकर वजन कमी करू शकतात. यासोबतच शाकाहारामुळे पचन सुरळीत होणे व स्नायूंवरील चरबी कमी होणे असे अनेक फायदे होतात. असे एका संशोधनात आढळले आहे.

स्नायूंवरील चरबी कमी झाल्याने ग्लुकोज-लिपीड मेटॅबॉलिझ्म सुरळीत होते. ज्यांना मेटॅबॉसिक सिन्ड्रोम व टाईप २ प्रकारचा मधुमेह आहे त्यांच्यासाठी शाकाहार अत्यंत उपयोगी आहे. असे संशोधक हाना काहलिओवा यांचे म्हणणे आहे.
टाईप २ मधुमेह असलेल्या ७४ लोकांचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला. काहींना शाकाहारी जेवण व काहींना पारंपारिक मधुमेह रोधक जेवण देण्यात आले. दोन्ही जेवण दिवसाला ५०० किलोकॅलरीपर्यंतच मर्यादित होते.
यामध्ये वजन कमी करण्यात शाकाहारी आहार हा पारंपारिक आहाराच्या तुलनेत दुप्पट प्रभावी असल्याचे लक्षात आले. शाकाहार घेणाऱ्यांचे वजन सरासरी ६.२ किलो व पारंपारिक आहार घेणाऱ्यांचे वजन ३.२ किलो कमी झाले.वजन कमी करणाऱ्यांप्रमाणेच वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही शाकाहार उपयोगी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments