Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यथंडीत व्यायाम करण्याआधी ह्या गोष्टी कराव्यात

थंडीत व्यायाम करण्याआधी ह्या गोष्टी कराव्यात

Winter Joggingथंडीत व्यायाम करण्याचा मज्जा काही औरच असते. विशेष म्हणजे थंडीमध्ये व्यायाम करणा-यांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. विशेष म्हणजे इतर ऋतुपेक्षा अवघड असते. यात हातपाय गार पडतात. थंडी हवा फुफ्फुसात जाते. त्यामुळे छातीत दुखते आणि दाब पडल्यासारखे वाटते. त्यामुळे थंडीत व्यायाम करण्याआधी या गोष्टीकडे लक्ष द्यावे.

पाणी भरपूर प्यावे

थंडीत व्यायाम करताना लोकांना तहान लागत नाही. परंतु वातानुकूलित कार्यालयात काम आणि कोरड्या हवामानामुळे बऱ्याचदा डिहायड्रेशन होते. या वेळी, डिहायड्रेशन झाले तर शरीराची चयापचय प्रक्रिया मंदावते. ज्यामुळे थकवा होतो. त्यामुळे दोन किमी धावल्यानंतर थोडेसे पाणी प्यावे, जेणेकरून तोंड कोरडे पडणार नाही आणि श्वास घेण्यास अडचण येणार आहे.

दीर्घ श्वास घ्यावा…

या दिवसात व्यायाम करताना थंडी वाजते. बाहेरील हवा शरीराला काट्याप्रमाणे टोचते. त्यामुळे कोणताही व्यायाम सुरू करण्याआधी दहा मिनिटाचा वाॅर्मअप करा. त्यानंतर दीर्घ श्वास घ्या. त्यानंतरच व्यायामाला सुरुवात करा. ३ ते ५ मिनिट थोड्या-थोड्या अंतराने ही प्रक्रिया करा.

ग्य कपडे घालावे

व्यायाम करताना जाड जॅकेट किंवा स्वेटर घालण्याएेवजी हलके कपडे घालावेत. आत शर्ट किंवा टीशर्ट घालावे. धावल्यानंतर शरीरात गर्मी जाणवू लागते. त्यामुळे आतील कपड्यामुळे स्वेटर सहज काढता येते. याशिवाय जर तुम्ही रनिंग करत असाल तर एखाद्या गडद रंगाची जॅकेट किंवा कपडे घालावेत. सकाळी फिरताना किंवा जाॅगिंग करताना वूलनचे कपडे घालावे. मफलर किंवा स्कार्फ डोक्याला बांधून घ्यावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments