रोज एक सीताफळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. यातील अँटिऑक्सिडंट्स तसेच पोटॅशियमसारखी पोषक तत्वे शरीरासाठी फायदेशीर असतात.
१. यात प्रोटीन्स आणि कॅल्शियम असते. यामुळे हाडे मजबूत होतात.
२. यातील कार्बोहायड्रेटमुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. भरपूर एनर्जी मिळते.
३. सीताफळमध्ये पोटॅशियम असते. ज्यामुळे हृद्यरोगांपासून बचाव होतो.
४. सीताफळमध्ये झिंक, कॉपर ही खनिजे असतात. चेहऱ्याला ग्लो वाढवण्यास ही खनिजे उपयुक्त करतात. केस लांब आणि घनदाट होतात.
५. यातील फॉस्फरसमुळे दात मजबूत होण्यास मदत होते. हिरड्यांच्या समस्या दूर होतात.