Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यदुपारच्या झोपेचे दुष्परिणाम?

दुपारच्या झोपेचे दुष्परिणाम?

दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाचे दोष निर्माण होतात. याचसोबत शरीरात मेदाचाही संचय होतो. त्यामुळे या व्याधींपासून लांब राहायचं असेल तर दुपारची झोप टाळलेलीच बरी.

दुपारची झोप अपायकारक….

निरोगी आरोग्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. दुपारी जेवण झाल्यावर ताणून देणं तर प्रत्येकालाच आवडतं. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात.

वजन वाढणे….

दुपारच्या झोपेमुळे शरिरात फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो. यामुळे अतिप्रमाणात वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.

दुपारच्या झोपेने कफदोष….

दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.

त्वचा विकार बळावतात….

कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.

मधुमेह देखील वाढतो….

दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments