Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणगिर्यारोहक अरुण सावंतांचा अठराशे फूट खोल दरीत पडून मृत्यू

गिर्यारोहक अरुण सावंतांचा अठराशे फूट खोल दरीत पडून मृत्यू

Arun Sawantकोकण :  प्रसिध्द गिर्यारोहक अरुण सावंत हे हरिश्चंद्रगडावरील कोकणवाड्यावरील मोहिमेत गेले होते. सावंत हे शनिवारपासून बेपत्ता होते. अखेर आज रविवारी त्यांचा मृतदेह सापडला. सावंत हे ट्रेकिंग क्षेत्रातलं मोठं नाव होतं. त्यांच्या अंदाजे तीन दशकांच्या कारकिर्दीत अनेक वाट शोधल्या होत्या.

गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक, सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे अरुण सावंत शनिवारपासून, हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरील मोहिमेत बेपत्ता झाले होते आज त्यांचा मृतदेह सापडला. या मोहिमेत ३० जण सहभागी झाले होते. सावंत हे मोहिमेचे प्रमुख होते. रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह सापडला असून, दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सावंत यांच्यासह ३० गिर्यारोहक कोकण कड्यावर रॅपलिंगसाठी आले होते. ते या मोहिमेचे नेतृत्व करत होते. शनिवारी संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते. रॅपलिंगचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला होता. इतर २९ जण हे टप्पा उतरूनही आले होते. सावंत हे दोराच्या साह्यानं रॅपलिंग करत असताना, बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. स्थानिक आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीनं शोध घेण्यात येत होता. त्यांचा आज मृतहेद सापडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात असून गिर्यारोहकांना मोठा धक्का बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments