Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeदेशनिर्भया प्रकरण : आरोपी पवन गुप्ताच्या आव्हान याचिकेवर पुन्हा सुनावणी!

निर्भया प्रकरण : आरोपी पवन गुप्ताच्या आव्हान याचिकेवर पुन्हा सुनावणी!

Pawan Gupta accused of nirbhaya gang rapeनवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोषी पवनकुमार गुप्ता याने गुन्ह्य़ाच्या वेळी आपण अल्पवयीन होतो अशी याचिका आधी दाखल केली होती. ती दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्याच्या विरोधात त्याने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

न्या. आर. बानुमथी, न्या. अशोक भूषण व न्या. ए.एस बोपण्णा हे याचिकेची सुनावणी करणार आहेत. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया प्रकरण झाले त्या वेळी आपण अल्पवयीन होतो अशी जी याचिका  पवनकुमार गुप्ता याने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली होती, ती फेटाळल्याच्या विरोधात त्याने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, दोषी पवनकुमार गुप्ता याने असे म्हटले आहे, की १ फेब्रुवारीला नियोजित करण्यात आलेली फाशीची शिक्षा रोखण्यात यावी.

१९ डिसेंबर रोजी पवनकुमार गुप्ता याची गुन्ह्य़ावेळी अल्पवयीन असल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्या वेळी  पुराव्यासाठी बनावट कागदपत्रे दाखल करण्यात आली होती, तसेच त्याचे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी  चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येईल असा आदेश नव्याने जारी केला होता. याआधी त्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येईल असे आदेश जारी करण्यात आले होते.  पण नंतर एकाने दयेची याचिका दाखल केल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मुकेश कुमार याची दयेची याचिका शुक्रवारी  राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर १ फेब्रुवारीला चौघांना फाशी देण्याचा आदेश जारी करण्यात आला. १४ जानेवारीला मुकेश व विनय यांच्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या. अक्षय व पवन यांनी फेरविचार याचिका दाखल केलेल्या नाहीत.

निर्भयाच्या खुन्यांना १ फेब्रुवारी फाशी…

दिल्ली न्यायालयाने निर्भयाच्या खुन्यांना शुक्रवारी चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येईल असा आदेश नव्याने जारी केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments