Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईप्रकाश आंबेडकर- असदुद्दीन ओवेसी वोट कटींग मशीन

प्रकाश आंबेडकर- असदुद्दीन ओवेसी वोट कटींग मशीन

Asaduddin Owaisi-Sanjay Raut-Prakash Ambedkarमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी उत्तम कायदे पंडित आहेत. मात्र, हे दोन्ही नेते वोट कटींग मशीन असून, त्यांच्यामुळे भाजपला फायदा होतो असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करतो. ते कायदे पंडित आहेत. तसेच एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे उत्तम कायदे पंडित असून ती आपली गोष्ट कायद्याव्दारे चांगल्या प्रकारे पटवून सांगतात. त्यांची गोष्ट लोकांनाही पटते. परंतु त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे भाजपला फायदा होतो. दोन्ही नेते वोट कटींग मशीन आहेत. त्यामुळे त्यांनी विचार करणे गरेजेचं आहे. असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान विचारलेल्या प्रश्नोत्तराच्या काळात दिला.

संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान राज्याच्या व देशाच्या प्रश्नांवर स्पष्टपणे भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी आणि अजित पवारांबद्दल चांगले गुण आणि सल्ल्याबाबत स्पष्टपणे मतं मांडली. स्वत: ला मंत्रिपदाची संधी मिळाली परंतु मी मंत्रीपद घेतलं नाही. मला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाचं काम उत्तम पणे करायचं सांगितलं होतं तो मी करतो असं संजय राऊतांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments