Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशरद पवार हे जाणते राजेच : संजय राऊत

शरद पवार हे जाणते राजेच : संजय राऊत

Sanjay Raut Sharad Pawar,Sanjay Raut, Sharad Pawar,Sanjay, Raut, Sharad, Pawar

मुंबई : शरद पवारांना जनेतेने जाणता राजा ही उपाधी दिली आहे. शरद पवारांनी तळागाळातील लोकांसाठी,कष्टक-यांसाठी कामं केलेली आहेत. त्यामुळे ते जाणते राजेच आहेत. असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

भाजपचे नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव न घेता मंगळवारी टीका केली होती. उदयनराजे भोसले म्हणाले होते, या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले होते. त्याबाबत आज बुधवारी राऊत यांनी एका प्रश्नोत्तरात शरद पवार हे जाणते राजेच आहेत. असं स्पष्ट केलं. उदनराजे भोसले काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत असंही राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments