Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeमनोरंजनकपिल शर्माच्या घरात नन्ही परी आली!

कपिल शर्माच्या घरात नन्ही परी आली!

kapil-sharma,Ginni,Kapil Sharma,Sharma,Kapilमुंबई: अभिनेता कपिल शर्माच्या घरातून गोड बातमी मिळणार याची सर्वांनाच उत्सूकता होती. शेवटी ती आनंदाची बातमी आली आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथने मुलीला जन्म दिला. सध्या दोघांच्याही घरात आनंदाचं वातावरण असून मित्र- मैत्रिणी आणि आप्तेष्टांकडून आई-बाबांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामुळे कपिल आणि गिन्नींचे स्वप्न पूर्ण झाले.

कपिलने स्वतः ट्विट केलं…

कपिलने स्वतः ट्वीट करून ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. त्याने ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘मुलगी झाली असून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्हा सर्वांना भरभरून प्रेम. जय माता दी.’ कपिलच्या या ट्वीटवर अनेक सेलिब्रिटींनीही त्याला शुभेच्छा दिल्या. कपिलला मुलगी झाल्याचे कळताच कीकू शारदा, रकुल प्रीत, गुरु रंधावा, सायना नेहवाल, दिया मिर्झा यांसारख्या अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्याला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments