skip to content
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आरे कारशेडला स्थगिती; एक पानही तोडणार नाही!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आरे कारशेडला स्थगिती; एक पानही तोडणार नाही!

Uddhav Thackeray Press Conference in Mantralaya, uddhav thackeray, aarey car shed, metro project,press conference, aareyमुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरेमधील मोठा निर्णय जाहीर केलं. आरे कारशेडच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आली. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम होणार नाही. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, आरेतील एक पानही तोडलं जाणार नाही. मला कारभारात पारदर्शकता हवी आहे. मी विकासाच्या विरोधात नाही परंतु अंधाधूंद कारभार चालणार नाही असंही उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. मला पत्रकारांची मदत हवी आहे. मला तुमची मदत फक्त कोंडीत पकडण्यासाठीच नाहीतर कोंडी फोडण्यासाठी देखील मदत हवी आहे. पत्रकारांनी सरकारचे कान आणि डोळे व्हावे असंही उध्दव ठाकरे म्हणाले. मला खात्री आहे तुम्ही जो प्रेम जिव्हाळा दाखवला आहे, तो यापुढेही टिकून राहील, असंही उध्दव ठाकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मंत्रालयातील पत्रकारसंघाच्या कार्यालयात पत्रकारांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची एक प्रतिमा भेट म्हणून दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments