Placeholder canvas
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईउध्दव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये ताज लँड हॉटेलमध्ये गुफ्तगू

उध्दव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये ताज लँड हॉटेलमध्ये गुफ्तगू

Sharad Pawar ,Uddhav Thackerayमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मागितला. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये एक तास चर्चा झाली.

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजित पवारही उपस्थित होते. यावेळी सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली. पुढील दिशा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील महत्वांच्या विषयांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे आता सर्वांना उत्सूकता लागलेली आहे की, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सत्तास्थापन करण्याचा दावा कधी करतात. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments